पुणे: पुणे शहरात ठिकठिकाणी पीएमपीएलची बस बंद पडल्याच्या सर्रास आढळून येतात. मात्र अश्याच नगर रोडवर बंद पडलेल्या एका बसला पुणे पोलिसांनी दणका दिला आहे. पोलिसांनी पीएमपीएलला चक्क ५ हजार रुपयाचा दंड ठोठावला आहे.
हि बस रस्त्यात बंद पडल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे दंड आकारल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
सदर पी एम पी एल बस नगर रोडवर बंद पडली होती व वाहतुकीस अडथळा निर्माण करीत होती म्हणून 5000/- रू दंड वसूल करण्यात आला आहे.#PuneCityTrafficPolice pic.twitter.com/LLMtmfBNPJ
— Pune City Traffic Police (@PuneCityTraffic) October 1, 2019