पुणे, दि. 27 –शहरातील मध्यवर्ती पेठामधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांना जलद सेवा देण्यासाठी पीएमपीने काही बसच्या मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून शहराच्या मध्यवर्ती असलेल्या बाजीराव व शिवाजी रस्त्यावरून धावणाऱ्या बसच्या मार्गात बदल केला असून, या बस शास्त्री रस्ता आणि टिळक रस्त्यामार्गे वळविण्यात आल्या आहेत. बाजीराव रस्त्यावरून फक्त पुण्यदशमची स्वारगेट-शिवाजीनगर ही बस सेवा सुरू राहणार आहे.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या शिवाजी व बाजीराव रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी असते. त्यामुळे प्रवाशांना शिवाजीनगरहून स्वारगेटला जायला आणि स्वारगेटहून शिवाजीनगरला जायला खूप वेळ लागत असल्याची प्रवाशांनी तक्रार केली होती. याची दखल पीएमपी प्रशासनाने घेतली असून, बाजीराव रस्त्यावरून धावणाऱ्या बस शिवाजीनगरकडे जाताना गुरूवारपासून दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, फग्युर्सन रस्त्यामार्गे जातील. स्वारगेटकडे येताना जंगली महाराज रस्ता, डेक्कन, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे येतील.