पुणे – फ्रेन्ड्स क्रिकेट क्लब तर्फे पहिल्या फिनिक्स करंडक अजिंक्यपद प्रौढ गट टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 40 वर्षांवरील प्रौढ वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 6 ते 15 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संचालक आणि संयोजक श्रीनिवास सरवदे, प्रफुल्ल मानकर, सचिन जयवंत, सौरभ रवालिया, शैलेश देशपांडे, सचिन कापडे, अनिल मांडके, प्रशांत घेवारी, महेश शिंदे आणि स्नेहलकुमार कासार यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन चित्रपट आणि नाट्य अभिनेते अजय पुरकर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेमध्ये अंध मुलांच्या संघांचा एक प्रदर्शनीय सामनाही खेळविण्यात येणार आहे. तसेच स्पर्धेचे सामने हे यू-ट्युब लाईव्ह दाखविण्यात येणार आहेत.