पुणे – करोनाची तिसरी लाट ही लहानग्यांसाठी धोक्याची असल्याचे सांगितले जात आहे. जिल्हा आणि महापालिका प्रशासनानेही त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही
यात 17 खासगी आणि ससून रुग्णालय अतिदक्षता विभागाचे 109 बेड उपलब्ध आहेत. तर, नवजात अर्भकांसाठी 85 आणि ऑक्सिजनची सुविधा असलेले 163 बेड उपलब्ध आहेत. ही लाट ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
बालक रुग्णांची संख्या सध्याच्या लॉकडाऊनमध्ये कमी झाली; परंतु येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ती वाढू शकेल. यात मुलांना ताप, सर्दी, खोकला, अंगावर पुरळ, जुलाब, दम लागणे यांपैकी एक किंवा अधिक लक्षणे दिसून येतात.
प्रौढ व्यक्तींसाठी कोविडसाठी जी औषधे वापरली जातात, त्यांचा प्रयोग अजूनपर्यंत लहान मुलांमध्ये न झाल्याने ती औषधे त्यांच्यामध्ये वापरली जात नाहीत. तर, लक्षणांनुसार जी प्रचलित औषधे आहेत, तीच दिली जातात. मुलांना कोविड झाला, तरी त्यांच्यामध्ये गंभीर होण्याचे प्रमाण कमी आहे.
– डॉ. शशांक कदम, बाल फुफ्फुसविकार तज्ज्ञ
खासगी आणि सरकारी रुग्णालयात मिळून किती बेड आहेत; याची प्रत्यक्षात पूर्ण माहिती नाही. काहीच प्रकारचे व्हेंटिलेटर वगळता सर्वच मोठ्यांचे व्हेंटिलेटर लहान मुलांसाठी वापरता येत नाही. आगामी लाट लक्षात घेता लहान मुलांच्या उपचाराच्या नियोजनासाठी टास्क फोर्स सुरू करण्यात आला असून, बेड उपलब्धतेची प्रक्रिया सुरू केली आहे.
– डॉ. संजय नातू, अध्यक्ष, पुणे बालरोग डॉक्टर्स संघटना