बावधन – जोरदार पाऊस…मैदानावर हजारो नागरिक भर पावसात उभे…सायरन वाजवत गाड्यांचा ताफा…अशा वातावरणात भर पावसात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यासपीठावर येऊन नागरिकांना दिवाळीनिमित्त भेट दिली. तर पक्षाचे युवा नेते अभिजीत दगडे पाटील यांच्या कामाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक उपाध्यक्ष अभिजीत राजेंद्र दगडेपाटील आणि अश्विनी दगडे पाटील यांनी आयोजित दिवाळी सरंजाम वाटप शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शांताराम इंगवले, रामचंद्र ठोंबरे, महादेव कोंढरे, शिवसेना जिल्हाप्रमुख शंकर मांडेकर, सभापती बाबा कंधारे, अध्यक्ष काका चव्हाण, माजी नगरसेविका सायली वांजळे, युवक अध्यक्ष, किशोर कांबळे, बबनराव दगडे, दिलीप दगडे, सविता दगडे उपस्थित होते.
गर्दीने भरून गेलेले मैदान, त्यात पावसाचे आगमन म्हणजे विजयाची नांदी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, त्यांना बळ देणारे, आमचे दैवत “साहेब’ साक्षात आमच्या कार्यक्रमाला आले, खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली, असा भावना अभिजीत दगडे यांनी व्यक्त केली.
यावेळी तानाजी दगडे, सुदाम भुंडे, सागर साखरे, राजेंद भुंडे, नंदकुमार दगडे, सूर्यकांत भुंडे, दीपक दगडे, गणेश दगडे, आझाद दगडे, रंजना दगडे, रेश्मा खिलारे, बापुसाहेब दगडे, दत्तात्रय दुधाळे, शीतल दगडे, राजेश दगडे, सुदाम दगडे, स्वप्नील दुधाणे, गिरिष गुरुनानी, नंदुकुमार भोईर, योगेश सुतार, पांडुरंग दगडे उपस्थित होते.