पुणे – वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यावरून काँग्रेस आक्रमक झाले असून महिला काँग्रेसच्या वतीने आज केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध कऱण्यात आला. स्मृती इराणी हॉटेलवर पोहचण्याआधीच त्यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.
आज पुणे दौऱ्यावर असलेला इराणी यांना भेटण्यासाठी महिला काँग्रेसकडून प्रयत्न करण्यात आला, तसेच त्यांना चूल आणि बांगड्या देण्याचा प्रयत्न महिलांनी केला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी आणि पोलिसांनी मिळून कॉंग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रोखलं.
भाजप कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या महिला यांच्यात झटापट झाल्याचं देखील दिसून आलं. यानंतर काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुण्यातील चतुश्रुंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
पुण्यात पोहचल्यानंतर साडे पाच वाजता त्या बालगंधर्व रंगमंदिर येथे शिवानंद द्विवेदी लिखित अमित शहा आणि भाजपची वाटचाल या पुस्तक प्रकाशन सोहळयाला उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.