पुणे – शहरातील पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्गांचे काम अंतीम टप्प्यात असतानाच महापालिकेने विस्तारीत टप्प्याच्या मार्गांना मान्यता दिली आहे. स्थायी समिती पाठोपाठ महापालिका आयुक्तांनी मुख्यसभेतही या प्रस्तावास मान्यता दिल्याने हा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे, शासनाकडूनही लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर तत्काळ मान्यता देऊन हा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला जाण्याची दाट शक्यता असून पुणेकरांसाठी ही अनोखी भेट ठरणार आहे.
शहरातील मेट्रो सेवेचा दुसरा टप्पा सुरू झाला असताना सोमवारी महापालिकेने मेट्रोच्या पुढील दोन टप्प्यांनाही अंतिम मान्यता दिली आहे. यानुसार खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि पौड फाटा-वारजे-माणिकबाग या मेट्रोचे नव्या दोन टप्प्यांना मान्यतेचा प्रस्ताव आता राज्य शासनाकडे वनाज ते रामवाडी या मार्गाचे वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली असे विस्तारीकरण केले जाणार आहे. या मार्गाची एकूण लांबी 12.700 कि.मी. असून खर्च 3 हजार 609 कोटी रुपये इतका आहे.