पुणे (प्रतिनिधी) – लक्ष्मी रोड येथील गजबजलेल्या ठिकाणाहुन दुचाकीच्या डीक्कीतून सोन्याचे मंगळसुत्र चोरी करणाऱ्या सराईत चोरटयास फरासखाना पोलीसांनी अवघ्या 1 तासात अटक केली. त्याचेकडुन चोरलेले मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 16 ऑगस्ट रोजी विजयराज लॉजसमोर फिर्यादी ओंकार संजय हाटकर यांनी त्यांच्या पत्नीचे 11 ग्रॅम वजनाचे मंगळसुत्र दुरुस्त करुन त्यांचे ज्युपीटर गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. यानंतर ते गाडी पार्क करुन मुलीला कपडे घेण्यासाठी तुळशीबागेत गेले होते.
यावेळी आरोपीने त्यांच्या गाडीच्या डिक्कीमधुन मंगळसुत्र चोरुन नेले. फरासखाना पोलीस स्टेशन गुन्हा दाखल होताच . तपास पथक शोध घेत असताना हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार बाबा लक्ष्मण बनपट्टे ( रा. वडारवाडी, मॉडेल कॉलनी) याने केला असल्याची माहीती मिळाली.
त्यानूसार शोध घेऊन गुन्हा एक तासामध्ये उघडकीस आणला. बनपट्टे हा पुणे शहर आयुक्तालय हद्दीतील सराईत चोर असुन त्याचेवर यापुर्वी देखील गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक अजितकुमार पाटील हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, उपनिरीक्षक अजितकुमार पाटील, पोलीस अंमलदार समीर माळवदकर, संदीप कांबळे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, महावीर वलटे, राकेश क्षीरसागर, रिजवान जिनेडी, ऋषीकेश दिघे, अभिनय चौधरी, वैभव स्वामी, मोहन दळवी, गणेश आटोळे यांच्या पथकाने केली.