पुणे (प्रतिनिधी) – अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तिघा परराज्यातील तस्करांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून गांजा, चरस, हशिश तेल असा मिळून ३ लाख २३ हजारांचा अमली पदार्थ साठा जप्त करण्यात आला आहे.
नासिर शेख (रा. उंड्री), पुनीत कदयान, शरत नायर (रा. मूळ- चेन्नई ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी तीन परप्रांतीय तस्कर गांजासह विविध अमली पदार्थाच्या विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती योगेश मोहिते यांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांच्याकडून गांजा, चरस, हशिश तेल असा ३ लाख २३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रकुमार देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, सुजीत वाडेकर, संदीप जाधव, राहूल जोशी, विशाल दळवी, पांडुरंग पवार, प्रवीण उत्तेकर, विशाल शिंदे, संदेश काकडे, रेहना शेख, नितीन जाधव, योगेश मोहिते यांनी केली.