पुणे – आगामी लोकसभा निवडणूक व रमजान ईद, रंगपंचमी, होळी, शिवजयंती, गुड फ्रायडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, श्रीराम नवमी, महावीर जयंती, हनुमान जयंती, असे विविध धर्मांचे धार्मिक सणांच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत रुट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. (Pune : Kondhwa police holds route march ahead of Lok Sabha elections & festivities)
सदर रूट मार्च चे आधी सर्व अधिकारी व अंमलदार यांना बंदोबस्ताच्या अनुषंगाने सुचना देण्यात आल्या. हा रुट मार्च कोंढवा पोलीस स्टेशन येथुन सुरु करुन डावीकडे वळून कोंढवा वाहतुक विभाग-तुबा मस्जिद-सिटी लॉन्स-पारगेनगर-ओमाकार गार्डन- वेल कम हॉल चौक-सरळ जाफरान हॉटेल कडुन उजवीकडे वळून लाईफ लाईन हॉस्पीटल- मदीना हॉटेल चौक कौसरबाग मस्जीद- सुप्रीम हॉटेल चौक, एनआयबीएम रोड मेफेर एलिंगजा सोसायटी चौक- ज्योती चौक- भिमनगर-विठ्ठल मंदीर-भैरवनाथ मंदीर -कोंढवा गावठाण कोणार्कपुरम सोसायटी-बादशह नगर सोसायटी- सत्यानंद हॉस्पिटल-आशिर्वाद चौक-शितल पेट्रोलपंप अशोका म्युज सोसायटीनंतर पुन्हा कोंढवा पोलीस स्टेशन असा घेण्यात आला.
हा रूट मार्च पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे मानसिंग पाटील तसेच सी.आर. मोबाईल, तपास पथक पोलिस अधिकारी व पोलीस स्टेशन कडील पोलिस अंमलदार, सी. आय. एस. एफ प्लाटुन यांचे उपस्थितीत पार पडला.