पुणे :– क्रिकेट नेक्स्ट अकादमी तर्फे पहिल्या नॉक 99 करंडक अजिंक्यपद टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 19 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंसाठी आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा 11 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कटारीया हायस्कूल मैदान, मुकूंदनगर येथे होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संचालक आणि संयोजक विक्रम देशमुख व सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई यांनी दिली.
या स्पर्धेचे उद्घाटन 11 ऑक्टोबर रोजी सुजनीलचे कार्यकारी संचालक आशिष देसाई आणि महाराष्ट्रीय मंडळ याचे सहकार्यवाह आणि पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार रोहन दामले यांच्या हस्ते होणार असून स्पर्धेचा सलामीचा सामना सेंच्युरी क्रिकेट अकादमी आणि 22 यार्डस अकादमी या दोन संघांमध्ये रंगणार आहे.