विश्रांतवाडी – आयआयटी आणि एम्स सारख्या संस्थेत शिक्षण घ्यायचे विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. ते स्वप्न पूर्ण होण्याकरीता राजस्थानच्या ‘कोटा’ येथील “मोशन एज्युकेशन” ही आघाडीची शैक्षणिक संस्था पुण्यात सुरू झाली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन खासदार अमोल कोल्हे यांनी केले.
विमाननगर येथील मोशन एज्युकेशन या संस्थेच्या केंद्राचे उद्घाटन खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुनील टिंगरे, अशोक पवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे, जगदीश मुळीक, रामभाऊ मोझे, मोशन एज्युकेशनचे संचालक नितीन भुजबळ, राजेंद्र खांदवे, गौरव शर्मा, गणेश सातपुते, लिज्जत पापडचे सुरेश कोते, मॉर्डन एज्युकेशनचे सेक्रटरी रजपुत सर, माजी सिनेट सदस्य सुरेश तोडकर, एव्हरेस्टवीर जितेद्र गवारे.
पांडुरग खेसे, माजी नगरसेवक अनिल टिगंरे, बापूराव कर्णे गुरुजी, राहुल भंडारे, सुमन पठारे, संदिप ज-हाड, सुनिल मलके, ऍड. भगवान जाधव, राजेद्र शिरसाठ, रामशेठ गावडे, महेश गलांडे, अशुतोश जाधव, सचिन भगत, नारायण गलांडे, रमेश आढाव, शंकरकाका भुमकर, सतिश म्हस्के, ऍड नानासाहेब नलावडे, चंद्रकात पगारिया, जितेंद्र ललवानी, पोपटशेठ धोका आदी उपस्थित होते.
खासदार कोल्हे म्हणाले की, ‘इंद्रायणी मेडिसिटी” आणि पश्चिम महाराष्ट्रातील औद्योगिक प्रगती पाहता आगामी काळात उत्तम डॉक्टर आणि अभियंत्यांची मोठी गरज निर्माण होणार आहे. यावेळी आमदार सुनील टिंगरे, अशोक पवार, माजी आमदार बापूसाहेब पठारे, जगदीश मुळीक यांनीही शुभेच्छा दिल्या. संचालक गौरव शर्मा, सेटर हेड मा. संध्या पांडे यांनी आभार मानले.