पुणे- शिरुर येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रवर पडलेल्या दरोडा घटनेच्या अनुषंगाने सुरक्षेच्यादृष्टीने समर्थ पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
बैठकीमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक उल्हास कदम आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे बॅंकांच्यावतीने सचिन डोंगरे, रुषभसिंग, राहुल श्रीवास्तव, एस काटकर यांच्यासह 25 ते 30 पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बॅंकेत सीसीटीव्ही, सिक्युरीटी गार्ड, लॉकर्सची सेफ्टीबाबत घ्यावयाची काळजी व बॅंकेच्या ऑनलाइनसंदर्भात घडणारे सायबर गुन्ह्यांबाबत विष्णु ताम्हाणे व उल्हास कदम यांनी उपस्थित बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, पोलिसांनी बॅंकेस दिलेल्या भेटीची नोंद करण्यासाठी व्हीजीट बुकची व्यवस्था करण्याचे सांगण्यात आले. मयूर मायक्रोटेक्नीक्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर दत्तात्रय एकशिंगे यांनी त्यांच्या कंपनीने तयार केलेल्या अलार्म व सेन्सर सिस्टीमबाबत प्रात्यक्षिके दाखवली. तसेच, बॅंकेत असलेले जुने सेन्सर व अलार्म सिस्टीम अद्ययावत करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व प्रकारची खबरदारी घेण्याबात मार्गदर्शन करून पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी उपस्थितांचे आभार मानले.