पुणे- पुण्याहून उत्तर भारतात जाणाऱ्या तीन एक्स्प्रेस आणि कोयना एक्स्प्रेसच्या डब्यांच्या (कोचेस) संख्येत कायमस्वरुपी वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
कोल्हापूर-मुंबई कोयना एक्स्प्रेसला 24 फेब्रुवारीपासून आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस 25 फेब्रुवारीपासून 1 स्लीपर श्रेणीचा जादा डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे आता एक वातानुकूलित तृतीय श्रेणी, 4 स्लीपर, दोन वातानुकूलित चेअर कार, 9 द्वितीय श्रेणी आसन या प्रमाणे डबे असतील. तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुणे-लखनौ -पुणे एक्स्प्रेस, पुणे-काझीपेठ-पुणे, पुणे-जसिडीह (झारखंड)-पुणे या रेल्वेला एक वातानुकूलित तृतीय श्रेणीचा जादा डबा जोडण्यात येणार आहे. एक वातानुकूलित द्वितीय श्रेणी, पाच वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 9 स्लीपर क्लास, 4 द्वितीय श्रेणी आसनव्यवस्था आणि एक जनरेटर व्हॅन अशी या रेल्वेंची संरचना असेल.