वाघोली – विविध क्रीडा प्रकारांमध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी समाजाकडून मिळालेले प्रोत्साहन हेच सर्वोत्तम बक्षीस असल्याचे प्रतिपादन भाजप नेते अविनाश सातव पाटील यांनी केले.
वाघोली तालुका हवेली येथे अधिराज नटराज सातव पाटील याने खराडी येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला यानिमित्त अविनाश सातव पाटील मित्र परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी अविनाश सातव पाटील बोलत होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते अधिराज सातव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव,शिवसेना युवा नेते मच्छिंद्र सातव, निखिल सातव, अभिजित सातव, आव्हाळवाडी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सातव,गणेश सातव, अक्षय सातव,मिनार जगताप,अविनाश साकोरे, आदी मान्यवर उपस्थित होते.