मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर येत आहेत. ऋषभला डेहराडूनमधील रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.
दरम्यान, या अपघातानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या पोस्टनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. ऋषभच्या अपघातानंतर उर्वशीनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, सध्या तिची ही चांगलीच व्हायरल होत आहे. अभिनेत्री उर्वशीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे.
यामध्ये उर्वशीनं पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. उर्वशी या फोटोत सुंदर दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे उर्वशीनं दिलेल्या कॅप्शननं वेधले आहे. उर्वशीनं हा फोटो शेअर करत ‘प्रार्थना करत असल्याचे’ म्हटले आहे. सध्या अभिनेत्रीचा हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून, नेटकऱ्यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.