इंदापूर – तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या सहा वेगवेगळ्या रस्त्यांसाठी पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तब्बल 19.41 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आमदार भरणे म्हणाले की, या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकर रस्त्यांची कामे सुरू होणार आहेत.
यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून जांब-उद्धट-मानकरवाडी-कर्दनवाडी रस्ता (लांबी 8.00 किमी) रक्कम रु. 5.79 कोटी व बावडा-शेटफळ हवेली रस्ता (लांबी 6.600 किमी)- रक्कम रु.5. 33 कोटी या दोन कामांना जवळपास 11 कोटी 12 लाखांचा निधी प्राप्त झाला असून, या कामांची निविदा प्रक्रियाही चालू झाली आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-2 जिल्हा वार्षिक योजनेमधूनसुद्धा आपल्या तालुक्यासाठी चार रस्ते मंजूर झाले असून, यामध्ये प्रजिमा-65 न्हावी ते काळोखे वस्ती-मारकड वस्ती ते लोणी देवकर औद्योगिक वसाहत रस्ता. ग्रा. मा. 9 (लांबी 2.450 किमी)- रक्कम 2 कोटी 8 हजार रु., कारंडेमळा निमसाखर रस्ता (लांबी 2.470 किमी)- रक्कम 1.46 कोटी, बोरी ते खंडोबा मंदिर-जोरी वस्ती हनुमान वस्ती ते काझड रस्ता (लांबी2.400 किमी)- रक्कम रु 2.17 कोटी आणि रा. म. 965 जी ते तरंगवाडी ते बुनगेवस्ती,
आंबेमळा रस्ता (लांबी 3.730 किमी)- रक्कम रु 2.66 कोटी अशा प्रकारे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जवळपास 11.55 किमीचे रस्ते मार्गी लागतील, एकूण 8 कोटी 29 लाख 8 हजार रुपयांचा निधी मिळाल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.रस्त्यांच्या कामाबाबत त्या-त्या भागातील नागरिकांची सातत्याने मागणी होत होती. त्यामुळे तालुक्याचा आमदार या नात्याने वरील कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करून 19.41 कोटी मंजूर करून आणले आहेत.
तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून विकासकामे मंजूर करण्यासाठी मी सक्षम असून, “ए तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है।’ येणाऱ्या काळात यापेक्षा मोठा निधी आपल्याला प्राप्त होणार आहे. विरोधकांनी स्वतःचे साखर कारखाने नीट चालवून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसबिले देण्यासाठी लक्ष द्यावे.
-दत्तात्रय भरणे, आमदार इंदापूर