सविंदणे-सविंदणे (ता. शिरूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शुभांगी पडवळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी सरपंच सोनाली खैरे यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी शुभांगी पडवळ यांचा सरपंचपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गावामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून विविध विकास कामांचा डोंगर उभा करुण गावचा चेहरामोहरा बदलला आहे.
माजी गृह मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, भिमाशंकर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी नवनिर्वाचित सरपंच यांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब भोर यांनी केले तर भोलेनाथ पडवळ यांनी आभार मानले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून मंडल आधिकारी माधुरी बागले, तलाठी आबासाहेब मोरे, ग्रामसेवक हनुमंत चव्हाण यांनी काम पाहिले.
यावेळी माजी सरपंच सोनाली खैरे, उपसरपंच भाऊसाहेब लंघे, ग्रामपंचायत सदस्या मनीषा नरवडे, रेखा भोर, नंदा पुंडे, मालूबाई मिंडे, भोलेनाथ पडवळ, रवींद्र पडवळ, ईश्वर पडवळ, गोरक्ष लंघे व पॅनलप्रमुख उद्योजक, माजी सरपंच वसंतशेठ पडवळ, बाळासाहेब भोर, सचिन खैरे, चेअरमन रामदास पडवळ, भरत पडवळ, बाळासाहेब पडवळ, बारकू भापकर, मोहन किठे, दत्ता नरवडे, मयूर कोळेकर, गणेश कोळेकर, जयदिप लंघे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.