सविंदणे -शिरूर शहरात गेल्या महिनाभरापासून सोनसाखळी चोरांनी बाबुरावनगर, एसटी स्टॅण्ड, पाबळफाटा परिसरात दहशत घातली असून, सोनसाखळी चोरांना गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना अपयश येत आहे. 29 जानेवारी रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास शिरूर गावचे हद्दीत अहमदनगर – पुणे हायवेच्या सर्विस रोडवर महालक्ष्मी मार्बल दुकाना जवळून शारदा आढाव व तिची मुलगी स्कुटीवरून (एमएच 16 बीके 7936) जात असताना
स्कूटीचे पाठीमागून एक अनोळखी व्यक्ती त्याच्या ताब्यातील काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टा असेलेली होंडा शाईन मोटार सायकल हिच्यावरून येउन अचानक त्याने शारदा आढाव हीच्या गळयातील एक मोठे मंगळसूत्र, त्यातील चैन दोन तोळ्यांची त्यामधील अर्धभाग त्याचे वजन अंदाजे एक तोळा जबरदस्तीने हिसकावून मोटारसायकल वरून पळून गेला आहे.