भोर -महाराष्ट्रासह देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही लोकांनी आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल भोर शहरात शिवप्रेमी आणि भोरकरांच्या वतीने मोर्चा काढून निषेध करण्यात आला. शहरातील दुकाने बंद ठेवून व्यापारी आणि विविध दुकानदारांनी मोर्चाला पाठिंबा दिला.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याबद्दल भोर शहरातील “भोरकर’, विविध शिवप्रेमी संघटना यांच्या वतीने चौपाटी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतुळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा नगरपलिका,
मंगळवारपेठ मार्गे राजवाडा चौकापर्यंत निषेधाच्या घोषणा देत काढण्यात आला. त्यानंतर नायब तहसीलदारांकरवी भोरचे तहसीदार यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. दरम्यान भोर पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.