जळोची -वडिलांच्या नावे रेशन कार्ड असतानाही बोगस रेशन कार्ड काढून त्याद्वारे शासकीय धान्य घेत शासनाची फसवणूकप्रकरणी संदीप भोसले (रा. कानाडवाडी, चोपडज) यांच्याविरोधात वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. चोपडजचे तलाठी अशपाक इनामदार (रा. मुरुम) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
संदीप धनंजय भोसले यांनी त्यांचे वडील धनंजय जयसिंग भोसले यांच्या रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट असतानाही तेथील नाव कमी न करता दुसरे केसरी रंगाचे बोगस रेशन कार्ड त्यांची पत्नी मनीषा यांच्या नावे बारामती तहसील कार्यालयातून मिळवले. त्याद्वारे शासनाकडून धान्य घेत फसवणूक केली आहे.