– नीलकंठ मोहिते
इंदापूर -मागील 60 ते 70 वर्षांपासून इंदापूर तालुक्याचा असा वेगळा इतिहास आहे की, इंदापूर विधानसभेचा जे आमदार होतात. ते तालुक्यातच नव्हे; तर जिल्ह्यात राज्यात वेगळे ठरतात. यामध्ये दिवंगत नेते शंकराव पाटील, गणपतराव पाटील व सद्यस्थितीला माजी आमदार हर्षवर्धन पाटील, तसेच आमदार दत्तात्रय भरणे आहेत. ग्रामीण भागातील जनतेला जे हवे आहे. ते देण्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे हे यशस्वी ठरत असल्यामुळे, तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आमदार भरणे यांची क्रेझ अधिकची वाढली आहे.
भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना दोनदा पराभूत करून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर विधानसभेवर विजय मिळवला. विधानसभा निवडणुकी अगोदर, पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला जी साधने लागतात.
ज्या सुख – सुविधा लागतात, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी काम केले. या कामातूनच ते तालुक्याचे मामा बनले आणि आमदार देखील तब्बल दोनदा झाले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री पदाची शपथ आमदार भरणे यांनी घेतली. कधी नव्हे इतका निधी इंदापूर तालुक्यात आणून ठेवला. अहोरात्र मेहनत आमदार भरणे यांनी केल्यामुळेच आज तालुक्यात विकासाची गंगा वाहते आहे.
सर्वसामान्यांमध्ये मिसळण्या वृत्ती
सद्यस्थितीत माध्यमिक विद्यालय महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी आग्रह करतात सणसर सारख्या ग्रामीण भागात, विद्यार्थ्यांसमवेत आमदार दत्तात्रय भरणे डान्स यांनी करून प्रत्येक घटकाच्या बरोबर काम करण्याची, आणखी भूमिका माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे यांनी दाखवलेली आहे.
तर इंदापूर तालुक्यात व परिसरात कोणाच्याही शुभ कार्याला, आमदार पदाचा आव न आणता, स्नेहभोजन करत लोकात मिसळून जनतेला आपलेसे करत आहेत. तर अनेक नेते आमदार भरणे यांची कॉपी करण्यामध्ये व्यस्त आहेत. मात्र भरणे यांची वाढती क्रेझ तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात दरारा निर्माण करत आहे.