कोरेगाव भीमा – समाजातील मोठ्या सत्काराच्या प्रथा करण्याऐवजी विधायक सामाजिक कार्याने बदल करा. श्राद्ध व इतर शुभप्रसंगी कार्यक्रमाला पेन वह्यावाटप करत गरिबांच्या मुलांचे भविष्य बदला, लग्नातील सत्कार बंद करून शाळा डिजिटल करा, कीर्तने ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील श्री काळुबाई देवी मंदिर देवस्थानाच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले. यावेळी सणसवाडी परिसरातील ग्रामस्थ व नागरिकांनी उत्स्फूर्त गर्दी केली यावेळी महिला भगिनींची व बालकांची उपस्थिती लक्षणीय होती. हॉस्पिटल विकत घेणारे करोना काळात गेले आहेत.
संपत्ती कामाला नाही आली सतकर्म कामाला येणार बंद करून ठेवा. धर्मावर संकट आले तर नेत्याविरहित एक व्हा, धार्मिक द्वेष वाढवणाऱ्या पासून लांब रहा, समाज विघातक शक्ती मोठ्या प्रमाणात द्वेष पसरवत आहेत. यावेळी निवृत्ती महाराज इंदुरीकार यांना गायक किरण महाराज,
सुमटकर महाराज यांनी गायनाची सुंदर साथ केली तर सणसवाडी भजनी मंडळाचे टाळांची उत्तम साथसंगत केली. या कार्यक्रमाचे आयोजन श्री काळूबाई मंदिर देवस्थान, श्री खंडोबा, रुक्मिणी – विठ्ठल, श्रीराम, भैरोबा, नरेश्वर मंदिर देवस्थान, समस्त ग्रामस्थ सणसवाडी व भाविक भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.