पिंपरी -मोशी गाव येथे यात्रेनिमित्त रविवारी (दि. 19) भंडारा आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील हजारो भाविक येत असतात. त्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग आणि मोशी परिसरातील वाहतुकीत रविवारी (दि. 19) आणि सोमवारी (दि. 20) दुपारी चार ते रात्री साडेअकरा या वेळेत बदल ेक्ले आहेत.
याबाबत पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी आदेश दिले आहेत. डायमंड चौक चिखली येथून देहूफाटा (भारतमाता चौक) पुणे नाशिक महामार्ग मोशीकडे जाणाऱ्या मार्गावर अवजड वाहनांस बंदी आहे.