पुणे –प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएल) अनेक उपाययोजना केल्या जातात. त्याचाच एक भाग म्हणजे प्रवाशांना लवकर तिकीट देता यावे यासाठी प्रशासनाकडून वाहकांना ई-तिकीट मशीन देण्यात आल्या आहेत. परंतु, या मशीनच आता वाहकासांठी डोकेदुखी ठरत आहेत. या मशीनमध्ये अनेक त्रूटी असून त्या वापरताना वाहकांना अनेक अडचणी येत आहेत.
तिकीट काढत असताना अचानक मशीन बंद होणे, मशीन हॅंग होणे, चार्जींग लवकर संपणे, वेगवेगळ्या तिकीटावर एकच सीरियल नंबर येणे, प्रत्यक्षात प्रवाशांना तिकीट दिलेली संख्या आणि मशीनमध्ये दाखवत असलेली तिकीटांची संख्या यात तफावत, ई-मशीन पुरेश्या प्रमाणात उपलब्ध नसणे यासारख्या अनेक अडचनी येत असल्याचे राष्ट्रवादी कामगार संघटनेचे सचिव सुनील नलावडे यांनी सांगितले. तसेच, या त्रुटी प्रशासनाच्या वेळोवेळी निर्दशनास आणून दिल्या आहेत. पंरतु, याकडे प्रशासन जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नलावडे यांनी सांगितले.
प्रत्येक डेपोतून याची माहिती घेवून लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल आणि वाहकांना पुरेश्या प्रमाणात ईमशीन उपलब्ध करुन दिल्या जातील.- राजेश रुपणवर, वाहतूक व्यवस्थापक
वाहकांना होणाऱ्या त्रासाची प्रशासनाने लवकरच दखल घ्यावी आणि या ई-मशीनच्या त्रूटी दूर कराव्यात.
सुनील नलावडे, सचिव, राष्ट्रवादी कामगार संघटना