हर्षवर्धन पाटलांना भाजप खुश करणार का, याकडे लक्ष
इंदापूर – इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी अजित पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतोय असे ठणकावून आमदार दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. तर काही दिवसापूर्वी आमच्या सरकारला तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. भाजप नेतृत्वाने घेतलेला निर्णय आमच्यासाठी शिरसंधान आहे. विधानसभा निवडणुकीत पक्ष नेतृत्व तिकीट वाटपाचा तिढा सोडवेल, असे भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केल्याने, भाजप विधानसभा, विधानपरिषद अशी विभागणी करत हर्षवर्धन पाटील यांना आगामी काळात खुश करणार का? अशी चर्चा रंगली आहे.
हर्षवर्धन पाटील हे कॉंग्रेस पक्षात असताना राष्ट्रवादीच्या त्रासाला कंटाळून कॉंग्रेसला रामराम केला. ज्यांच्या त्रासामुळे कॉंग्रेस सोडली व भाजपचे कमळ हाती घेतलेले पाटील आणि उपमुख्यमंत्री पवार यांचे राजकीय विळयां भोपळ्याचे नाते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मान्य करत पवार यांनी समर्थन भाजप शिवसेना सरकारला दिले आहे. लोकसभा, विधानसभा, निवडणुकीचे तिकीट वाटप भाजपचे नेतृत्व योग्य पद्धतीने करतील, असा विश्वास पाटील यांनी दिला आहे.
विकासाला गती येणार, श्रेयवाद बंद होणार?
हर्षवर्धन पाटील कॉंग्रेस पक्षात असताना मलाच कॉंग्रेस पक्षाचे विधानसभेचे तिकीट मिळणार असे ठणकावून सांगत होते. भाजप निवासी हर्षवर्धन पाटील झाल्यानंतर भाजप पक्ष नेतृत्व जो आदेश देईल तो पाळला जाईल. अशी नरमाईची भूमिका हर्षवर्धन पाटील यांनी घेतली आहे. दरम्यान, पाटील आणि भरणे आता सत्ताधारी झाली असल्याने तालुक्याचा विकासाला मोठी गती येऊन श्रेय वादाची लढाई बंद होणार का हे पाहणे उत्स्युक्याचे आहे.
शेतकऱ्यांना आपलसे करण्यासाठी?
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखाना या दोन सहकारी साखर कारखान्यांना केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून भरीव स्वरूपात कर्जपुरवठा प्राप्त झाल्यामुळे आगामी राजकीय वाटचालीसाठी हर्षवर्धन पाटील यांना फायदेशीर ठरणार आहे. आपल्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या तब्बल दोन सहकारी साखर कारखान्यांना भाजपाने केलेली देशपातळीवरून मदत हीच उद्याचे मतदार शेतकऱ्यांना आपल्याशी करण्यासाठी वरदान ठरणार आहे.
बोटावर मोजण्या इतरकेच लोक..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पाठबळ आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पाठीशी निर्माण झाल्यामुळे काही बोटावर मोजण्याइतके लोक वगळता संपूर्ण राष्ट्रवादी कॉंग्रेस आमदार भरणे यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. आता मला शेतीच्या पाण्यासाठी काम करायचे आहे. ही भूमिका आमदार भरणे यांनी घेतल्याने, अधिकच्या मतांचा टक्का आमदार भरणे यांना मिळणार का हे पहावे लागणार आहे.