चिव्हेवाडी घाटात घटना : दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू
गराडे – पुरंदर तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या केतकावळेजवळ देवडी हद्दीतील चिव्हेवाडी घाटात एका वळणावर व्हॅगनार गाडीवर ट्रक पलटी झाल्याने व्हॅगनारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. यात दोन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
गणेश ऊर्फ बाळ लोकावळे (वय 28, रा. किकवी), तृप्ती अक्षय जगताप (वय 26, रा. सुपे, ता. पुरंदर), असे मृत्यू झालेल्याची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक हा सासवडवरून कापूरहोळला जात होता. तर सासवडकडे येत असणाऱ्या व्हॅगनार गाडीवर देवडी हद्दीत एका वळणावर ट्रक पलटी झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात दोन वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला आहे. सासवड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी. एल. माने करीत आहेत.