तळेगाव ढमढेरेत विकासकामांबाबत व्यापक चर्चा
तळेगाव ढमढेरे – दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या मुहूर्तावर शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तळेगाव ढमढेरे येथे नियोजित दौऱ्यातून वेळ काढून कृषी उत्पन्न उपबाजार समिती तळेगाव ढमढेरे येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संवाद साधला.
शिरूर तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्याच्या राजकारणात तळेगाव ढमढेरेची भूमिका महत्वाची ठरते. तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून जिल्ह्यात ओळख आहे. पक्षाचे तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी तळेगाव ढमढेरेचे आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर डॉ. कोल्हे यांनी नियोजित दौऱ्यातुन वेळ काढून कार्यकर्त्यांची भेट घेतली.
सुरु असलेली विकासकामांची माहिती घेत सवांद साधला. यावेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब नरके, घोडगंगा उपाध्यक्ष पोपटराव भुजबळ, शिरूर तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, महिला तालुका अध्यक्षा विद्या भुजबळ, संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष सुदीप गुंदेचा, सरपंच अंकिता भुजबळ,
तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष रमेश भुजबळ, शिरूर तालुका राष्ट्रवादी प्रवक्ते बाळासाहेब ढमढेरे, माजी उपसरपंच नवनाथ ढमढेरे, खरेदी- विक्री संचालक शहाजी ढमढेरे, शिवाजी भुजबळ, उद्योजक अमोल गायकवाड, उमेश भुजबळ, मिनीनाथ ढमढेरे, गोविंद भुजबळ, राजेंद्र केदारी, मधुकर भूमकर, किसन भुजबळ उपस्थित होते.