पौड – पौड (ता. मुळशी) येथे अज्ञात दुचाकीस्वराच्या धडकेत प्रसिद्ध व्यावसायिक संतोष महादेव क्षीरसागर (वय 47) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकी चालक धडक बसल्यानंतर पळून गेला असून ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री साडेअकरा वाजता घडली.
संतोष क्षीरसागर हे आपले काम आटोपून रात्री बायको, बहीण आणि मुलीसह घरी चालले पौड बसस्थानकाहून आपल्या पौड काँम्प्लेक्स येथील घरी चालले होते.
येथे असलेल्या सागर इन गार्डन हाँटेल समोर मागून आलेल्या दुचाकीस्वराने संतोष व त्यांची बहिणीला जोरदार धडक दिली. यात संतोष यांचे डोके दगडीवर आदळले तर बहिणही बाजूला पडली. नातेवाईकांनी संतोष यांना पुणे येथील खासगी रुग्णालयात नेले; मात्र तत्पूर्वी त्यांचे निधन झाले.
पिरंगुट घाटात काही दिवसांपूर्वी रमलर (पांढरे पट्टे) टाकण्यात आले. यामुळे येथे वाहनाचा वेग कमी झाला आहे. पौड गावाच्या दोन्ही बाजूला सपाट व उताराचा रस्ता असल्याने येथे वाहने वेगात असतात. गतीरोधक किंवा रमलर टाकावेत, अशी पौड ग्रामस्थांची गेल्या अनेक दिवसांची मागणी आहे.हा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला असून अनेक निष्पाप नागरिकांचे यात नाहक बळी जात आहेत.