महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन
राजगुरूनगर – शहरात महात्मा फुले समाज विकास प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून ,महात्मा फुले यांच्या 133 व्या स्मृतिदिनानिमित्त खेड पंचायत समिती आवारात अभिवादन करण्यात आले. तसेच त्यांच्या कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला.
यावेळी खेडचे गटविकास अधिकारी विशाल तांबे, महात्मा फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम बापू घुमटकर, खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विनायक घुमटकर, माजी उपनगराध्यक्षा सारिका घुमटकर, व्याख्याते कैलास मुसळे, अशोक कडलक , राष्ट्रपती पारितोषिक प्राप्त जि.रं. शिंदे, विलास भास्कर, विष्णू घुमटकर, अशोक घुमटकर, धीरज घुमटकर आदी मान्यवरांनी फुले यांच्या पुतळ्या पुष्पहार घालून अभिवादन केले.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष शांताराम घुमटकर, विनायक घुमटकर, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, कमल कळमकर, कैलास मुसळे यांनी मनोगते व्यक्त केले. दलित व वंचित समाजावर होणार्या अन्यायाविरुद्ध तसेच जुन्या चालीरीती विरोधात लढणारे फुले दाम्पत्याचे यशस्वी प्रयत्न, यशस्वी उद्योजक, स्री शिक्षणाचे प्रवर्तक आदी कार्याला उजाळा दिला.
पुणे येथील भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाच्या कामाला सुरुवात झाल्याने बहुजन समाजाला सरकारने न्याय ि्दल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले. गणेश घुमटकर निलेश पांढरकर ,बाबाजी गायकवाड , विष्णू लडकत,सोपान घुमटकर, प्रभाकर माळी, कैलास दुधाळे, प्रभाकर माळी, धीरज घुमटकर उपस्थित होते.