वेल्हे- धनगर समाजाला आरक्षण द्या; अन्यथा खुर्ची खाली करा, अशी मागणी करीत वेल्हे सकल धनगर समाजाच्या वतीने मेंगाई चौकात रस्तारोको करीत एल्गार पुकारण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करीत धनगर समाजाला घटनेत असलेल्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
वेल्हे पंचायत समितीपासून बाजारपेठमार्गे घोषणा देत मेंगाई चौकात रास्ता रोको करण्यात आला. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी तहसीलदार यांना दिले आहे.
यावेळी तुकाराम कोकरे, नाना तांबे, नथुराम डोईफोडे, आनंद शिंदे, रमेश मरगळे, संजय हिरवे, बाळासाहेब ढेबे,रामचंद्र ढेबे, रामभाऊ ढेबे, विलास ढेबे, लक्ष्मण डोईफोडे, विठ्ठल डोईफोडे, अंकुश कचरे, शंकर ढेबे, विकास खुटेकर, शिवाजी मरगळे, अंकुश खरात, संतोष कचरे, राम खरात, विठ्ठल मरगळे, रमेश मरगळे, अनिल कचरे, सुनील पाडुरंग मरगळे, पांडुरंग कचरे, संतोष ढेबे उपस्थित होते.
मेंढपाळांवरील अन्याय दूर करावा, धनगर समाजासाठी सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली आहे, त्याची अंमलबजावणी तातडीने करावी, आदी मागण्यांसह हे आंदोलन पोलीस बंदोबस्तात शांततेच्या मार्गाने करण्यात आले.