मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या लाखोंचे जंगी स्वागत
कोरेगाव भीमा : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव मुंबईकडे निघाला आहे. त्यांच्या गाड्यांसाठी डिंग्रजवाडी ग्रामस्थांकडून मोफत डिझेल देण्यात आले. याप्रसंगी डिंग्रजवाडीचे माजी उपसरपंच बारीकराव रामचंद्र गव्हाणे, बाप्पूसाहेब गव्हाणे, मधुकर गव्हाणे, दिलीप गव्हाणे, माजी चेअरमन रमेश गव्हाणे, लक्षदीप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष सचिन गव्हाणे, शंभूभक्त साईनाथ गव्हाणे, संदीप गव्हाणे, तुषार गव्हाणे, विकास गव्हाणे, बाप्पूसाहेब गव्हाणे, नवनाथ गव्हाणे, गणेश नाबगे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी समाज बांधव कार्यकर्त्यांना चलो मुंबईची हाक दिली आहे. अंतरवाली सराटी येथून २० जानेवारी रोजी पदयात्रा सुरू झाली.
मजल दरमजल करत २६ जानेवारी रोजी ही पदयात्रा चेंबूरमार्गे मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईत पदयात्रा पोहोल्यानंतर आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क येथे जरांगे पाटील आमरण उपोषण करण्याची शक्यता आहे
मोफत डिझेल देणारे महाराष्ट्रातील एकमेव गाव
मुंबईकडे निघालेल्या मराठा बांधवांना पुणे-नगर महामार्गावरील प्रत्येक गावांतील कार्यकर्त्यांनी जेवण, नाश्ता पिण्याच्या पाण्याची जंगी सोय केली आहे. लाखोंच्या संख्येने निघालेल्या कार्यकर्त्याच्या सोयीसाठी मराठा समाज एकवटला आहे. मुंबईकडे निघालेल्या कार्यकर्त्यांना हातभार लागावा, यासाठी मोफत डिझेल देणारे महाराष्ट्रातील एकमेव डिंग्रजवाडी गाव असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.