मंचर : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे विद्या विकास विद्यालयात ग्रंथ दिंडी आणि ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती प्राचार्य अंकुश शिंगाडे यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळी अवसरी बुद्रुकचे अध्यक्ष विष्णुकाका हिंगे पाटील, सचिव वसंतराव हिंगे पाटील, अवसरी बुद्रुकच्या लोकनियुक्त सरपंच सारिका हिंगे, जय गुरुदेव ट्रस्टचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गणेश मेंगडे, उपाध्यक्ष विकास हिंगे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, विविध पुस्तके पाहण्याच्या उद्देशाने ग्रंथालयाचे विभाग प्रमुख, रमेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी गावांमधून पारंपरिक पद्धतीने ग्रंथ दिंडीच्या माध्यमातून गायन, भजन करण्यात आले. अंकुश टाव्हरे यांनी गायन केले. या प्रदर्शनात विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते. सुरेश जारकड यांनी आभार मानले.