शिवरत्न जिवाजी महाले यांच्या शौर्याला उजाळा
भोर – छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांच्या 388 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मागावी कारी (ता. भोर) येथे भोर तालुका नाभिक संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले.
भोर तालुका नाभिक संघटना, शिवरत्न जिवाजी महाले स्मारक समिती, ग्रामपंचायत कारी यांचे वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोर (शेटेवाडी चौपाटी) येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. आंबवडे येथे जिवाजी महाले यांच्या समाधीस अभिषेक व अभिवादन करण्यात आले.
यावेळी भोर ते कारी रॅली काढण्यात आली होती. कारी येथे कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, शिवरत्न जिवाजी महाले व सरदार कान्होजी जेधे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जयंतीनिमित्त जन्माचा पाळणा घेण्यात आला. अनेक मान्यवरांनी जिवाजी महाले यांच्या कार्याची माहिती दिली, तसेच प्रतापगडावरील पराक्रमाची यशोगाथा ऐकवली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख संतोष घोरपडे, पुणे जिल्हा नाभिक महामंडळाचे कार्याध्यक्ष सुभाष निढाळकर, प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष विनायक सणस, सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज रणधीर जेधे, पुणे शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, भोर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष शशिकांत वाघ, माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, माजी नगर सेवक दत्तात्रय वाईकर,बाबुराव तावरे, शशिकांत पालकर, गणेश पवार, प्रकाश शिंदे, माजी नगरसेवक दीपक पालकर,
कारीचे सरपंच सतीश ढेबे, सदस्य पोपट घोलप, मनिषा तावरे, तंटामुक्ती अध्यक्ष बाजीराव घोलप, नाभिक संघटनेचे विकास शिर्के, संतोष शिंदे, विशाल दळवी, प्रवीण घोडके, संतोष उल्हाळकर, मनोज शेडगे, रवी पालकर, बाळू शिंदे, गणेश शेडगे, सागर उल्हाळकर, संजय जाधव, संतोष तावरे, महिला अध्यक्ष नंदा साळुंखे, जनाबाई पालकर, चित्रा उल्हाळकर, ज्ञानेश्वर तावरे, अंकुश तावरे, सागर यादव, गणेश पालकर, नंदु क्षीरसागर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिव शरद पवार यांनी केले.