चिंबळी – विविध बक्षिसे आणि खासदार शरद पवारांच्या उपस्थितीने गाजलेल्या चर्होली खुर्द (ता.खेड) येथील मी सेवेकरी सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित साहेब कसेरी बैलगाडा शर्यतीत चिंबळी येथील अमोल दत्तात्रय बहिरट व धामणी येथील अक्षयकुमार राजेंद्र जाधव यांच्या बैलजोडी जुगलबंदीने प्रथम क्रमांक स्कॉर्पिओचे बक्षीस पटकावले. 11.68 मिली पॉईंट इतक्या वेळात निशाण गाठत बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवला.
यावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे,माजी आमदार विलास लांडे, आयोजक सुधीर मुंगसे, बाजार समितीचे संचालक सोमनाथ मुंगसे, देवदत्त निकम, मंगलदास बांदल, उद्योजक विठ्ठल मणियार, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष हिरामण सातकर, किशोर दांगट, महाराष्ट्र केसरी दत्तात्रय गायकवाड, महानकेसरी दिलीप माने व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.