चाकण – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. यावेळी नार्वेकर यांनी शिंदे गट हाच खरा शिवसेना पक्ष असल्याचा निवाडा दिला. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयावर खेड तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या निकालाच्या निषेधार्थ खेड तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)च्या वतीने (दि. 11) निषेध करण्यात आला.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, सेना नेते अमोल पवार, तालुका प्रमुख रामदास धनवटे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विजया शिंदे, जिल्हा सहप्रमुख अशोक खांडेभराड, शिवाजी वर्पे, चाकण शहर प्रमुख शेखर घोगरे, साहेबराव कड, लक्ष्मण जाधव, गणेश नाणेकर, शेखर पिंगळे, कविता करपे, स्वामी कानपिळे, रंगनाथ गोरे, किरण गवारी, रामहरी आवटे, आशपाक शेख, ऋषीकेश व्हावळ, अनिल मिसर, चंदन मुर्ह, दत्ता शिंगाडे, प्रेम जगताप, किरण शेलार आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रामदास धनवटे यांनी तिखट शब्दात समाचार घेताना म्हणाले की, सत्तेचा गैरवापर कसा होतो हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे. त्या निकाला वरुन दिसून आले आहे. ठिकाणी दिला त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला होता. त्यामध्ये राज्यपालांनी केलेली घटना चुकीची होती. त्यावेळी निवडलेले प्रतोद जे होते ते सुद्धा त्यांनी नियमबाह्य ठरवले होते. त्यानंतर त्यांचे अपेक्षा अशी होती की त्या घालून दिलेल्या चाकोरीमध्ये अध्यक्षांनी निकाल द्यावा. तस न करता केवळ आणि केवळ राजकीय पद्धतीचा निकाल देऊन लोकशाहीची हत्या करण्याच काम नार्वेकरांनी केले असल्याचे सांगत त्यांचा जाहीर धिक्कार आणि निषेध केला.