बेल्हे – आळे (ता. जुन्नर) येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवलेल्या श्री रेडा समाधी मंदिराच्या श्रीक्षेत्र आळे ते श्रीक्षेत्र आळंदी कार्तिकी पायीवारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान सोमवारी (दि. 4) झाले.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वेद बोलविलेल्या रेडा समाधी आळे या ठिकाणी असून गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणाहून दरवर्षी श्रीक्षेत्र आळे ते श्रीक्षेत्र आळंदी कार्तिकी वारी निघत असते. याही वर्षी अतीशय उत्साहात हा दिंडी सोहळा पार पडत आहे. प्रस्थानाची महापूजा विणेकरी रामदास महाराज सहाने, दीपक टकले, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संदीप निमसे यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी बाळकृष्ण महाराज कुर्हाडे, देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष निलेश भुजबळ, सचिव अविनाश कुर्हाडे, खजिनदार अमोल भुजबळ, धनंजय काळे, प्रसन्न डोके, कान्हू पाटील कुर्हाडे, विलास शिरतर, संतोष कुर्हाडे, म्हतु सहाने, पांडुरंग डावखर, संजय गाढवे, सुनील जाधव, गणेश शेळके, संदीप पाडेकर, होनाजी गुंजाळ, ज्ञानेश्वर गाढवे,
दिनकर राहिंज, संतोष डावखर, पालखी सोहळा प्रमुख अरूण गुंजाळ, पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक नागेश कुर्हाडे, राजेंद्र धोंगडे, गिरीश कोकणे आळे गावचे माजी सरपंच दीपक कुर्हाडे, गणेश गुंजाळ, प्रदीप गुंजाळ, मुकूंद भंडलकर आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.