पुणे – धार्मिक स्थळांवर देवदर्शनासाठी येणा-या वृध्द महीलांना प्रसादा मध्ये गुंगीचे औषध देवुन, त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करणा-या झारखंड राज्यातील महीलेला अटक करण्यात आली. ही कारवाई फरासखाना पोलिसांनी केली.
पिंकी परीयाल (रा.जमशेदपुर, टाटानगर, ईस्ट सिंगभुम, राज्य झारखंड) असे अटक आरोपीचे नाव आहे. फरासखाना पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार शनिवार पेठेत रहाणाऱ्या एका 72 वर्षाच्या महिलेने जून महिण्यात एक तक्रार दाखल केली होती. त्यानूसार बुधवार पेठ येथील मोबाईल मार्केट समोरील फुटपाथवर एक अनोळखी महीलेने महीना 2000 रुपये मिळवुन देते, तुम्ही माझ्या सोबत चला असे म्हणुन, तिस रिक्षाने स्वारगेट येथे नेले होते.
त्यानंरत तीला गुंगीचे औषध असलेला प्रसाद देऊन तिच्या पिशवीतील 650 रुपये व अंदाजे अडीच तोळे वजनाचे सोन्याची माळ चोरी केली होती म्हणुन वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयाचा तपास करत असताना अंमलदार अभिनय चौधरी व सयाजी चव्हाण यांना सीसीटीव्हीमध्ये सदरची महीला ही पुणे स्टेशन येथील एका लॉज मध्ये जाताना दिसुन आली. सदर लॉजचे रजिस्टरची पाहणी केली असता त्यामध्ये तीचे नाव व पत्ता सापडला.
दरम्यान ती परत चोरी करण्याचे उद्देशाने पुणे स्टेशन येथिल एका लॉज वर येणार असल्याची खबर पोलीस अंमलदार मेहबुब मोकाशी यांना मिळाली. त्यानूसार सापळा रचून तीला ताब्यात घेण्यात आले. तिच्या कडुन गुंगीचे औषध व इतर मुद्देमाल जप्त करुन अटक करण्यात आली आहे. िंपंकी ही मुळची झारखंड राज्यातील असुन ती वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरुन तेथील वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणी वृध्द महीलांना हेरते. त्या महीलांना गुंगीचे औषध देवुन, त्यांना बेशुध्द करुन त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करते. तीने नाशिक आणि शिर्डीमध्येही असे गुन्हे केले आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक मनोज अभंग, पोलीस अंमलदार अभिनय चौधरी, सयाजी चव्हाण, मेहबुब मोकाशी, सचिन सरपाले,आकाश वाल्मीकी, वैभव स्वामी, शरद वाकसे,रिजवान जिनेडी, मोहन दळवी,राकेश क्षीरसागर,ऋषीकेश दिघे, महंमद हनीफ शौकत शेख,मयुर भोकरे, अमोल सरडे, आशाराणी कांबळे, निशा कुंभार, पुनम ओव्हाळ, यांच्या पथकाने केली आहे.