पुणे – घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीने पतीवर चाकुने वार केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पतीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरूआहेत.
इम्रान खान (वय 46, रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे जखमी झालेल्या पतीचे नाव आहे. या प्रकरणी इम्रानची पत्नी नाझनीन हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इम्रानचे वडील उस्मान (वय 71) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे.
रमजान महिना सुरू असल्याने नाझनीनने इम्रानला घरखर्चास पैसे मागितले होते. इम्रानने पैसे देण्यास नकार दिल्याने नाझनीन आणि इम्रान यांच्यात वाद झाला. रागाच्या भरात नाझनीने स्वयंपाकघरातील चाकुने इम्रानवर वार केले. पोलीस उपनिरीक्षक वगरे तपास करत आहेत.