पुणे – दरोडा व वाहन चोरी विरोध पथकाने वाहन चोरी व मोबाईल चोरी करणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 87 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्यांच्याकडून वाहन चोरीचे पाच व मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
प्रशांत मधुकर भोसले, हसन इक्बाल शेख, अभिषेक विलास पाडुळे अशी अटक आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दिनांक 6 जून रोजी दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली गस्ती पथक हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते.
यावेळी पोलीस नाईक शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना खबर मिळाली की, त्यास दोन व्यक्ती गाड्या विकायच्या तयारीत असून त्यांची हालचाल संशयास्पद आहे. .त्यावरून सासवड रोड काळेपडळ येथे सापळा रचून त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी त्यांचा साथीदार आकाश यांचे सोबतीने वाहनचोरीचे तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले. त्यांच्यावर हडपसर, कोंढवा, यवत, लोणीकाळभोर आणी मुंबईत गुन्हे दाखल आहेत.
एकूण 1 , 87000 किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आणखी 64,000 किंमतीचे 8 मोबाईल हॅण्डसेट जप्त करण्यात आले असून त्याबाबत तपास चालू आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी,पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप, पोलीस अंमलदार. बुवा कांबळे,उदय काळभोर, दिनकर लोखंडे, राजेश अभंगे, विनायक रामाणे, मनोज शिंदे, राजेश लोखंडे, शिवाजी जाधव, मनोज खरपुडे, अमोल सरतापे, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने केली आहे.