पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे याच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रथमेश मारणे याच्यावर सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून त्याने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.दरम्यान एका मुलीशी ओळख वाढवून तीच्याशी मैत्री केली आणि शारीरिक संबंध ठेवल्याची तक्रार मुलीने केली आहे. तसेच त्याने अश्लील व्हिडिओ काढून तिला धमकी दिल्याचं सदर मुलीने तक्रारीत म्हटलंय.
दरम्यान याबद्दल अधिक माहिती अशी की, आरोपी हा फिर्यादीच्या कॉमन मित्रांपैकीच होता. आरोपीने सदर मुलीबरोबर ओळख वाढवून तीला खडकवासला धरण येथे फिरायला घेऊन गेला. येताना एका हॉटेलवर थांबवून तीच्याबरोबर जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुणे बंगळूर हायवेवरील राजगड हॉटेल, मुळशी अशा ठिकाणी नेऊन तीच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि
चोरुन अश्लील व्हिडिओ शूट केले. हे व्हिडिओ डीलीट करण्याबाबत विचारल्यावर त्याने टाळाटाळ केली.त्यानंतर फिर्यादीने या कृत्याबाबत पोलिसांत फिर्याद देण्याचे सांगितल्यावर त्याने तीला धमक्या दिल्या. आणि काय करायचे ते कर मी कुणाला घाबरत नाही असे उडवाउडवीचे उत्तर दिले.