पुणे – मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तीला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्यास समर्थ पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली. त्याच्या पत्नीला कपडे धुताना खिशामध्ये पुण्यातील एका हॉटेलची पावती सापडली होती. दरम्यान त्याच वेळी त्याची मेव्हणीही बेपत्ता होती. यावरुन त्याने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा उलगडा झाला. यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
महमंद रुबान महमंद मसूद (26 रा. बंडला गुडा, हैद्राबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की, मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या फिर्यादी महिलेची बहिण ही तिचे पती समवेत हैद्राबाद येथे रहात आहे. फिर्यादी महिलेची 17 वर्षीय अल्पवयीन पिडीत मुलगी ही रहाते घरातून दि. 18/5/21 रोजी बेपत्ता झाली होती झाली. त्यामुळे तिची आई व कुंटंबातील सदस्यांनी तिचा शोध सुरु केला, पिडीतीचे आईने हैद्राबाद येथील बहिणीला फोन केला.
तेव्हा बहिणीचा पती महमंद याने त्याला मुलीचा फोन आला होता व तिने मै घर छोडकर भाग गयी हू, और मरने जा रही हू असे म्हणाल्याचे सांगितले. तेव्हा मुलीचे आईने तिचेकडे फोन नाही तर तिने तुम्हाला फोन कसा केला असे विचारले असता त्याने तिचा शोध घेऊन कळवतो असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर तो स्वतः पिडीत मुलीला घेऊन दि. 19/5/21 रोजी तिचे घरी मुंब्रा येथे घेऊन आला व त्याने ती डोंबीवली रेल्वे स्टेशन जवळ मिळून आली असे बोलून तिला घरी सोडले व तो परत हैद्राबाद येथे घरी निघून गेला.
दरम्यान 5 दिवसांनी त्याचे कपडे धुण्यासाठी त्याचे बायकोने घेतले असता त्याचे पॅन्टचे खिशात रास्तापेठ पुणे येथील हॉटेलमध्ये मुक्काम केलेची पावती मिळून आली. म्हणून तिने तिच्या भावाला याची खात्रीकरणेस सांगितले. त्याने संबंधित हॉटेल येथे फोन करुन खात्री केली असता महमंद रुबान महमंद मसूद हा त्याचे पत्नीसोबत मुक्कास राहिला होता असे समजले. यानंतर पिडीतेचे नातेवाईकांनी सदर हॉटेलवर जाऊन खात्री केली असता महंमद हा पिडीतेला घेऊन हॉटेलमध्ये राहिला होता हे उघडकीस आले.
पिडीतेकडे तिची आई व नातेवाईकांनी बारकाईने विचारपूस केल्यावर तिने तिचे सोबत झालेले लैंगिक अत्याचार केल्याची माहिती सांगितली व कोणास काही सांगितले तर जीवे मारणेची धमकी दिल्याचे सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक ज्योती कुटे, सहायक फौजदार अर्जुन दिवेकर, पोलीस शिपाई निलेश साबळे, निलेश किरवे, शांताराम तळपे, शुभम देसाई यांनी केलेली आहे.