पुणे – गोट्या खेळताना हटकले म्हणून मुलांनी एकाच कुटूंबातील तीघांना दगडाने व हाताने मारहाण केली. ही घटना कोंढव्यातील शिवनेरी गल्ली येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी चार जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी शबाना शेख (38) यांच्या सोसायटीच्या समोरील गल्लीत चार मुले गोट्या खेळत मोठ्याने दंगा करत होती. त्यांना येथे खेळू नका असे म्हटल्याने त्यांनी एकत्र येत फिर्यादी तसेच त्यांचा 18 व 19 वर्षाचा मुलगा यांना दगडाने व हाताने मारहाण केली. यानंतर त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.