पुणे : चोवीस तासांत 91 नवे करोना बाधित; 4 जणांचा मृत्यू

पुणे – एकाही करोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही असे दोनच दिवस गेले असताना शुक्रवारी चार बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यातील दोन पुण्यातील तर दोन हद्दीबाहेरील आहेत. याशिवाय नव्याने 91 बाधितांची नोंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत 113 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सक्रीय बाधितांची संख्या गेल्या आठवड्यापासून कमी होत असून, सध्या ती 960 इतकी आहे. यातील 160 जणांची प्रकृती गंभीर आहे तर 148 जण ऑक्‍सिजनवर उपचार घेत आहेत. ऑक्‍सिजनवर असणाऱ्या बाधित रुग्णांची संख्याही कमी झाली असून, ही दिलासादायक गोष्ट म्हणावी लागेल. गेल्या 24 तासांत 5 हजार 763 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.