पुणे – दिवसभरात 244 करोना बाधितांची नोंद झाली असून, 139 जण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 11 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत 4 कोटी 88 हजार 293 बाधित सापडले असून, त्यातील 4 लाख 77 हजार 48 हजार जण बरे झाले आहेत. सद्यस्थितीत असलेल्या बाधितांमध्ये 2 हजार 448 जण सक्रीय बाधित असून, 209 जणांची प्रकृती गंभीर आहे, तर 361 जणांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत 11 बाधितांचा मृत्यू झाला असून, त्यातील सहाजण पुण्याबाहेरील आहेत. त्यांचा समावेश करून आजपर्यंत 8 हजार 797 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 8 हजार 469 संशयितांच्या स्वॅब टेस्ट झाल्या असून, आजपर्यंत 29 लाख 17 हजार 340 संशयितांच्या स्वॅबटेस्ट झाल्या आहेत.