पुणे, शहरातील करोना बाधित संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज नव्याने १७६ करोना बाधित सापडले, तर २६३ बाधित करोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात ३ हजार ४५६ संशयितांची नमुने तपासणी करण्यात आली.
त्यामध्ये १७६ बाधित सापडले असून, आज शहरातील बाधित दर ५.१ टक्के इतका आहे. करोनामुळे आज शहर भागातील २ जणांचा मृत्यु झाला. दरम्यान, सध्या सक्रीय रूग्णसंख्या १ हजार ३२६ इतकी असून, त्यातील ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर ६३ बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.