पुणे – राज्यातील थंडीचा जोर पुढील चार दिवस कमी राहणार असून, अधून-मधून ढगाळ वातावरण असेल. दरम्यान, पुणे शहरातही थंडीचा जोर कमी झाला असून किमान तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. पुढील दोन दिवस हवामान कोरडे तर सकाळी हलके धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
आद्रता दक्षिण व अग्नेय समुद्री वाऱ्यामुळे येत असल्यामुळे राज्याच्या दक्षिण मध्य भागात ढगाळ वातवरण राहील. त्यामुळे राज्यातील किमान व कमाल तापमान स्थिर राहील. दि. 17 डिसेंबरनंतर पुणे जिल्ह्यासह राज्यातील बहुतांश भागात किमान तापमानात घट होणार असल्यामुळे थंडीचा जोर पुन्हा वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.