पुणे : उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून 10 हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि महत्वाची कादपत्रे असा 1 लाख 9 हजारांचा ऐवज उत्तमनगर येथून चोरीला गेल्याप्रकरणी मिलिंद सोनटक्के (रा. उत्तमनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 18 मार्च रोजी सायंकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने आतमध्ये शिरून त्यांच्या घरातील दहा हजारांची रोकड, सोन्याचे दागिने, लोखंडी पेटीमधील महत्वाची कागदपत्रे असा 1 लाख 9 हजारांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एल. बी. डेंगळे करत आहेत.