पुणे (प्रतिनिधी) : अवैधरित्या घरगुती तसेच व्यावसायिक वापरासाठीचे गॅस सिलिंडरमधून छोट्या गॅस सिलिंडर मध्ये गॅस भरून विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले. केशव नगर मुंढवा भागातुन ताब्यात घेत त्याच्याकडून ८८ हजारांचे २७ गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. राहुल राजू भोसले (रा.आनंदनगर, केशवनगर) याच्या विरोधात जीवनश्याक वस्तू कायदा अंतर्गत मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केशवनगर भागात एक व्यक्ती घरगुती वापराच्या गॅस सिलिंडर मधील गॅस छोट्या गॅस सिलिंडर मध्ये भरून त्याची चढ्या भावाने विकरी करीत आहे अशी माहिती अमली पदार्थ व खंडणी विरोधी पथक पुर्व चे कर्मचारी प्रफुल्ल साबळे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विजय टीकोळे, सहायक निरीक्षक बापू रायकर, कर्मचारी अविनाश शिंदे, शिवाजी राहीगुडे,मनोज साळुंखे यांच्या पथकाने छापा टाकून राहुल भोसले याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून भारत गॅस कंपनी चे २७ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.
महंमदवाडीतून हातभट्टी जप्त…..
पथकाने दुसऱ्या एका कारवाईत महंमदवाडी भागात हातभट्टी दारू विक्री करणारा व्यक्ती नारायण परमेश्वर पांचाळ (वय ४८, रा. लक्ष्मी पार्क, महामंदवाडी) याला पकडले. तसेच पोलिसानी त्याच्याकडून ५१ लिटर हातभट्टी जप्त केली आहे. त्याच्याविरोधात वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.