पळसदेव- देशात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात हातावरचे पोट असलेल्या सर्वसामान्य नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. यासाठी पळसदेव येथील प्रवीण नगरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गरजू नागरिकांना मदतीचे आवाहन केले. यातून अनेकांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन 97 गरजू नागरिकांना गहू, तांदूळ, कांदे आदी जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. म्हम्हदेवी मंदिरात सोशल डिस्टन्स पाळून धान्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी मिलिंद यादव, प्रवीण नगरे, शशिकांत काळे, भारत मरळे, बापू खत्री, सागर बनसुडे, महेंद्र काळे, सोनाली काळे, हनुमंत काळे, रावसाहेब काळे, पोलीस पाटील अनिल कुचेकर, पोलीस पाटील धीरज काळे, कोतवाल गणेश सोनवणे उपस्थित होते.